२४ आणि २५ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद रहाणार !
कोल्हापूर – शहरातील शिंगणापूर बंधार्याला मोठी गळती लागली आहे. ही गळती २४ आणि २५ ऑक्टोबर या दिवशी काढण्यात येणार असल्याने हे दोन दिवस कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. या दिवसांत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.
या पाणीपुरवठ्यावर शहरातील ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ प्रभाग आणि त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग यांचा समावेश आहे. या भागांत पाणीपुरवठा बंद असणार आहे. २६ ऑक्टोबर या दिवशी पाणीपुरवठा अपुरा आणि अल्प दाबाने होईल. सर्वच प्रभागांतील नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी टँकरद्वारे पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.