नायजेरियाच्या नागरिकाकडून ७ लक्ष ४० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात
अमली पदार्थांनी ग्रस्त गोवा !
पणजी, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – गुन्हे अन्वेषण विभागाने नायजेरियाचा नागरिक आमेची डोनाटस् याला समवेत ७ लक्ष ४० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले आहे. डोनाटस हा उत्तर गोव्यात पार्ट्यांसाठी अमली पदार्थांचा पुरवठा करत असे. त्याच्याकडून ‘एल्.एस्.डी.’ ब्लाट्स, एक्स्टसी टॅबलेट आदी अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले आहेत.