फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) येथील श्री बिसारी देवीच्या मंदिराची बौद्धांकडून तोडफोड
|
|
फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) – येथील संकिसा बौद्ध तीर्थक्षेत्रामधील श्री बिसारी देवी मंदिराची बौद्ध धर्मातील काही जणांनी तोडफोड करत मंदिरावर लावण्यात आलेला भगवा ध्वज काढून तेथे पंचशील ध्वज लावला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण होऊन दगडफेकीची घटना घडली. यात काही जण घायाळ झाले. २० ऑक्टोबरला धम्म यात्रेच्या वेळी ही घटना घडली. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आदी अधिकारी पोचले. उपजिल्हाधिकार्यांनी ‘मंदिराच्या झालेल्या हानीची भरपाई करण्यात येईल’, असे लेखी आश्वासन दिले.
झंडे पर झगड़ा: बौद्धों ने बिसारी देवी के मंदिर पर लहराया अपना ध्वज, जमकर हुआ बवाल#LatestNews https://t.co/ykZsGdkZSG
— Zee Uttar Pradesh Uttarakhand (@ZEEUPUK) October 21, 2021
बौद्धांचा दावा आहे की, हे धार्मिकस्थळ बौद्ध स्तूप असून येथे भगवान बुद्धांचे ‘स्वर्गावतरण’ (स्वर्गातून पृथ्वीवर येणे) झाले होते, तर दुसरीकडे हिंदूंचा दावा आहे की, येथे श्री बिसारी देवीचे प्राचीन मंदिर आहे आणि येथे श्री हनुमानाचीही मूर्ती आहे. गेल्या ४० वर्षांपासून दोन्ही धर्मियांमध्ये वाद असून न्यायालयात यावरून खटलाही चालू आहे.