पनवेल मुख्य टपाल कार्यालयाकडून ‘पोस्टल वीक’ अंतर्गत सनातनच्या साधकाचा सत्कार !

श्री. पुष्कर अरगडे (डावीकडे) यांचा सत्कार करतांना ‘पोस्टमास्टर’ श्री. मोरे (उजवीकडे)आणि मध्यभागी अधिकारी श्री. पाटील

पनवेल – येथील मुख्य टपाल कार्यालयाकडून ‘पोस्टल वीक’च्या (टपाल सप्ताहाच्या) अंतर्गत ‘सनातन चैतन्य भांडार’चे प्रतिनिधी श्री. पुष्कर अरगडे यांचा फूल देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. भारतीय टपाल विभागाकडून प्रतिवर्षी १ आठवडा टपाल सप्ताह साजरा केला जातो. ‘सनातन चैतन्य भांडार’कडून सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वितरणासाठी उपलब्ध करण्यात येतात. ‘सनातन चैतन्य भांडार’कडून गत ८ वर्षे टपाल विभागाच्या ‘पार्सल’ सेवेचा लाभ घेतला जातो. ‘या सेवेत काही अडचणी आहेत का ? सेवेविषयी काय वाटते ?’ यांविषयी ‘पोस्टमास्टर’ (टपाल कार्यालयाचे प्रमुख) श्री. एच्. मोरे यांनी श्री. पुष्कर अरगडे यांच्याकडून जाणून घेतले. श्री. अरगडे यांनी ‘पनवेल टपाल विभागाकडून आम्हाला चांगली सेवा मिळते. तसेच यामध्ये काही अडचणी नाहीत’, असे श्री. मोरे यांना सांगितले. या वेळी टपाल विभागाचे अन्य अधिकारी श्री. पाटील हेसुद्धा उपस्थित होते.