‘इस्कॉन’ २३ ऑक्टोबरला १५० देशांत निदर्शने करणार !

‘इस्कॉन’ जे करत आहे, त्यांच्या बरोबरीने देशातील अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना, धार्मिक संघटना, साधू, संत आदींनी या आक्रमणांच्या विरोधात एकजुटीने आवाज उठवायला हवा, असे हिंदूंना अपेक्षित आहे ! – संपादक 

कोलकाता (बंगाल) – बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर झालेल्या आक्रमणांच्या विरोधात ‘इस्कॉन’कडून २३ ऑक्टोबर या दिवशी १५० देशांमध्ये निदर्शने करण्यात येणार आहेत. कोलकाता येथील इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी ही माहिती दिली.

बांगलादेशातील नोआखालीत ‘इस्कॉन’च्या २ साधूंना धर्मांधांनी ठार केले होते. त्यानंतर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रे यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करावा’, अशी मागणी इस्कॉनकडून करण्यात आली आहे.