बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई करा ! – बजरंग दलाचे मिरज येथे निवेदन
मिरज, २० ऑक्टोबर (वार्ता.) – बांगलादेशातील अल्पसंख्यांक शीख आणि हिंदू यांवर आक्रमण करणार्या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले. कार्यालयातील कर्मचारी मोरे यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी बजरंग दलाचे मिरज तालुका संघटक श्री. आकाश जाधव, सर्वश्री दीपक हेलवाडे, सागर कुंभार, सौरभ मोहिते, विनायक माळी, रितेश बैरागे, अजय गोसावी उपस्थित होते. बजरंग दलाच्या वतीने ठिकठिकाणी अशी निवेदने देण्यात येत आहेत.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
१. अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण मिळावे, तसेच न्याय मिळावा.
२. हिंसाचारात झालेल्या जीवित, तसेच मालमत्ता यांची हानीभरपाई मिळावी.
३. बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदु आणि शीख समाज यांवर होणारी आक्रमण पूर्णपणे थांबवून पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.
४. बांगलादेशातील अल्पसंख्यांक समाजाच्या मानवाधिकारांचे रक्षण व्हावे.