पू. पंडित केशव गिंडे यांच्या बासरीवादनाचे ध्वनीमुद्रण ऐकतांना साधकांना आलेल्या अनुभूती !
वादनाविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘मी प्रतिदिन ब्राह्ममुहूर्तावर संगीतोपचार म्हणून पू. पंडित केशव गिंडे यांचे बासरीवादनातील विविध राग ऐकतो. हे बासरीवादन ऐकतांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. पू. पंडित केशव गिंडे यांनी विविध रागांवर वाजवलेल्या बासरीची धून ऐकतांना आलेल्या अनुभूती
१ अ. राग : अहिर भैरव
१ अ १. ‘साक्षात् श्रीकृष्णाच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) बासरीतून स्वर येत आहेत’, असे जाणवणे आणि त्यातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे : मी प्रतिदिन पहाटे ४ वाजता ब्राह्ममुहूर्तावर पू. पंडित केशव गिंडे यांच्या ‘अहिर भैरव’ रागावरील बासरीची धून ऐकतो. त्या वेळी ‘साक्षात् श्रीकृष्णाच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) बासरीतून स्वर येत आहेत’, असे मला जाणवते. त्यातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होते. ब्राह्ममुहूर्तावर अधिक सात्त्विकता असल्यामुळे तेव्हा चैतन्य ग्रहण करणे सोपे जाते.
१ अ २. बासरीवादन ऐकल्यामुळे माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर होऊन मन निर्विचार झाले. माझी अंतर्मुखता वाढून मन शांत झाले आणि दिवसभर याचा लाभ होऊन माझा प्रतिदिन ४ – ५ घंटे नामजप होतो.
१ अ ३. घरातील रज-तमाचे आवरण दूर होऊन वातावरण साधनेसाठी पूरक होणे : घरातील रज-तमाचे आवरण दूर होऊन वातावरणाची शुद्धी झाली. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आपआपसांतील मतभेद न्यून होऊन वातावरण साधनेसाठी पूरक आणि उत्साही झाले.
१ आ. राग : ‘यमन’ आणि ‘मालकंस’
१. या रागांतील बासरीची धून ऐकतांना अनिष्ट शक्ती पळून गेल्याचे जाणवते.
२. माझे मन शांत होऊन देह हलका झाला. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला आणि माझ्या सकारात्मकतेमध्ये वाढ झाली.
१ इ. राग : ‘पुरिया कल्याण’ (तराणा)
१. माझ्या अनाहतचक्रावर चांगली स्पंदने जाणवली.
२. माझ्या छातीत दुखण्याचे प्रमाण न्यून झाले. (वर्ष २००६ मध्ये माझ्या हृदयाचे शस्त्रकर्म झाले आहे.)
२. पू. पंडित केशव गिंडे यांनी ‘अहिर भैरव’ या रागावर वाजवलेल्या बासरीची धून ऐकल्यानंतर जाणवलेली सूत्रे
२ अ. ‘साक्षात् श्रीकृष्णच बासरी वाजवत आहे’, या भावामुळे श्रीकृष्णाचा अंश असलेले गोप-गोपी (साधक) यांच्यातील कृष्णतत्त्व वाढत आहे’, अशी श्रद्धा निर्माण होऊन डोळ्यांसमोर श्रीकृष्णाच्या लीला तरळल्या.
२ आ. या घनघोर आपत्काळामध्ये गुरुमाऊलीने नामजपादी उपाय देऊन साधकांभोवती संरक्षककवच निर्माण केलेले असणे : श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून धरला आणि मुसळधार पावसापासून गोप-गोपींचे रक्षण केले. त्याचप्रमाणे या घनघोर आपत्काळामध्ये गुरुमाऊलीने नामजपादी उपाय देऊन साधकांभोवती संरक्षककवच निर्माण केले आहे. त्यामुळे साधक निश्चिंत मनाने कुठलीही भीती न बाळगता साधना करू शकत आहेत.’
– श्री. अनिल विष्णु पाटील (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) (वय ७५ वर्षे), नाशिक (जुलै २०२१)
पू. पंडित केशव गिंडे यांच्याशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या वार्तालापाची ध्वनीचित्र चकती पहातांना साधकाला आलेल्या अनुभूती१. ‘पू. पंडित केशव गिंडे यांनी बनवलेल्या केशववेणूचा स्वर दुसर्या वेणूच्या तुलनेत अतिशय मृदू जाणवला. २. खर्जातील (खालच्या पट्टीतील) स्वर ऐकतांना ‘मी एखाद्या मोठ्या पोकळीतून तरंगत जात आहे’, असे मला वाटत होते. ३. वार्तालापाच्या (मुलाखतीच्या) शेवटी वाजवलेल्या भैरवी रागातील आलाप ऐकतांना माझे ध्यान लागत होते. ४. माझ्या विशुद्धचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत मला चांगली स्पंदने जाणवत होती. ५. मला मोगर्याच्या फुलांचा सुगंध आला.’ – श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सतार वादक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.५.२०२१) |
|