बांगलादेशातील हिंदूंवरील धर्मांधांच्या अत्याचारांची माहिती देणारे ‘इस्कॉन बांगलादेश’ आणि ‘बांगलादेश हिंदू युनिटी कौन्सिल’ यांचे ट्विटर अकाऊंट्स (खाते) बंद !
ट्विटरचा हिंदुद्वेष !
ट्विटरची ही दडपशाही नवी नाही. यापूर्वीही ट्विटरने हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांचे अकाऊंट (खाते) बंद केले होते. ट्विटरची ही दादागिरी मोडून काढण्यासाठी हिंदूंनी समांतर माध्यम निर्माण करणे आता आवश्यक झाले आहे, हेच यातून लक्षात येते ! – संपादक
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
नवी देहली – बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेले अत्याचार तेथील प्रसारमाध्यमे लपवत आहेत. (बांगलादेशातील हिंदुद्वेषी आणि मुसलमानप्रेमी प्रसारमाध्यमे अन् भारतातील प्रसारमाध्यमे यांत विशेष भेद नाही, हेच लक्षात येते ! – संपादक) त्यामुळे या अत्याचारांना सामाजिक माध्यमांतून जगासमोर आणण्याचा प्रयत्न हिंदूंनी चालू केला आहे. त्यासाठी बांगलादेशातील ‘इस्कॉन बांगलादेश’ आणि ‘बांगलादेश हिंदू युनिटी कौन्सिल’ यांच्या ट्विटर हँडलने पुढाकार घेतला होता; मात्र या दोघांचे ट्विटर अकाऊंट ट्विटरकडून तडकाफडकी बंद करण्यात आले आहेत. बांगलादेशातील इस्कॉनच्या मंदिरावर आक्रमण करून धर्मांधांनी २ साधूंची हत्या केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून बांगलादेशात चालू असलेल्या हिंदूविरोधी अत्याचारांची माहिती जगाला मिळत होती. त्यामुळे जगभरातील हिंदूंकडून बांगलादेशातील सरकारवर कारवाईसाठी दबाव वाढू लागला होता.
‘Hindu voices are being silenced’: ISKCON pulls up Twitter for removing two accounts https://t.co/17EvTN8Hqf
— Republic (@republic) October 20, 2021