आपण बांगलादेशला घाबरत आहोत का ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा प्रश्न
बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचे प्रकरण
नवी देहली – बांगलादेशमधील हिंदूंच्या विरोधातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांचा केंद्रातील भाजप सरकार निषेध का करत नाही ? आपण बांगलादेशला घाबरतो का ? लडाखमधील चिनी अतिक्रमणाच्या भीतीनंतर आपण तालिबानने अफगाणिस्तान कह्यात घेण्याच्या सूत्रावरही माघार घेतली आणि त्यांच्याशी चर्चेची सिद्धता दाखवली. आता पुढे आपण मालदीवला देखील घाबरणार आहोत का ? असा प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या प्रकरणांवरून ट्वीट करून विचारला आहे.
India should invade Bangladesh if torture of Hindus does not stop: Subramanian Swamy https://t.co/QlN0H1xUFB via @dna @dna : Warned many years ago
— Subramanian Swamy (@Swamy39) October 17, 2021