सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून महाविद्यालये चालू होणार
कणकवली – कोरोना महामारीमुळे बंद असलेली महाविद्यालये शासनाच्या निर्देशानुसार २० ऑक्टोबरपासून चालू होणार आहेत. त्या दृष्टीने जिल्ह्यातील महाविद्यालयांतून सिद्धता करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेली महाविद्यालये चालू होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या २ मात्रा (डोस) घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे.