आर्यन खान याच्या समर्थनार्थ शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !
केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या कामाच्या चौकशीची मागणी
नागपूर – अमली पदार्थ प्रकरणात अटकेत असलेला चित्रपट अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या समर्थनार्थ येथील शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी न्यायालयात ‘ई-मेल’द्वारे याचिका प्रविष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी आर्यन खान याच्या सुटकेची आणि केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या (‘एन्.सी.बी.’च्या) कामाची चौकशी करण्यात यावी’, अशा मागण्या केल्या आहेत. याविषयी किशोर तिवारी म्हणाले की, एन्.सी.बी. मुंबई आणि चित्रपट क्षेत्र यांना अपकीर्त करत आहे. यातून काहीच निष्पन्न होणार नाही. एन्.सी.बी.चे अधिकारी त्यांच्या पदाचा अपवापर करत आहेत. आर्यन याच्या विरुद्धचा खटला क्षुल्लक आहे. त्यात काही वसुली होणार नाही. आर्यन याला अमली पदार्थ विकणारा आंतरराष्ट्रीय विक्रेता ठरवले गेले. आर्यन याला जामीन मिळणे, हा त्याचा हक्क आहे. इतरांना जामीन मिळतो; पण त्याला १७ दिवसांपासून कारागृहात ठेवले आहे.