‘गुरुकृपायोगा’च्या धोपट मार्गा विसरू नको ।
गुरुकृपायोगाच्या माध्यमातून साधना शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
संसाराची बिकट वाट,
दु:खी-कष्टी होऊ नको ।
देव-धर्माची सोपी वाट
सोडू नको ।
‘गुरुकृपायोगा’च्या (टीप १) धोपट मार्गा विसरू नको ।। १ ।।
राग कुणाचा मनी धरू नको ।
उणी-दुणी कुणाची काढू नको ।
प्रक्रियेने (टीप २) ‘स्वभावदोषांचे निर्मूलन’ करण्या विसरू नको ।। २ ।।
अपेक्षा करून दु:खी होऊ नको ।
शहाणा म्हणवूनी गर्वाचा भार वाहू नको ।
प्रक्रियेने ‘अहंचे निर्दालन’ करण्या विसरू नको ।। ३ ।।
कुलदेवतेचे ‘नामस्मरण’ करण्याविण राहू नको ।
त्रास (टीप ३) दूर होण्यासाठी
‘श्री गुरुदेव दत्ता’चे नाम घेण्या कंटाळा करू नको ।
हरिभजन नि गुरुस्मरण करण्या विसरू नको ।। ४ ।।
उगाच एकटा भटकत फिरू नको ।
देवाच्या अनुसंधानात रहाण्या कंटाळू नको ।
साधू-संताच्या ‘सत्संगा’चा लाभ घेण्या विसरू नको ।। ५ ।।
आळसाने कधी रिकामा बसू नको ।
‘सत्च्या सेवे’पासून दूर जाऊ नको ।
राष्ट्र-धर्माची सेवा करण्या विसरू नको ।। ६ ।।
मन-बुद्धीच्या संघर्षात अडकू नको ।
मीच सर्वेसर्वा म्हणूनी नास्तिकतेचा टेंभा मिरवू नको ।
शबरीचा ‘भक्ती-भाव’ विसरू नको ।। ७ ।।
खोटे-नाटे करूनी लोकांना लुटू नको ।
प्रारब्धाचे डोंगर वाढवू नको ।
सत्साठी तन, मन, धनाचा ‘त्याग’ करण्या विसरू नको ।। ८ ।।
इतरांना साहाय्य करण्यापासून थांबू नको ।
इतरांना समजून घेण्या अल्प पडू नको ।
सर्वांवर ‘प्रीती’ करण्या विसरू नको ।। ९ ।।
गुरुचरणी शरण जाण्या लाजू नको ।
‘गुरुकृपे’विण जन्म वाया घालवू नको ।
गुरुचरणी ‘कृतज्ञ’ रहाण्यास विसरू नको ।। १० ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विहंगम आध्यात्मिक उन्नतीसाठी ‘गुरुकृपायोग’ हा अष्टांग साधनामार्ग सांगितला आहे. हा साधनामार्ग भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोगावर आधारित असून प्रायोगिक (कृतीशील) साधनामार्ग आहे.
टीप २ – स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया
टीप ३ – अनिष्ट शक्ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास देतात.
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.१०.२०२०)