सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे सिंहगडावर पर्यटकांची गर्दी !
खडकवासला (जिल्हा पुणे) – १५, १६ आणि १७ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस सुट्या असल्याने सिंहगड आणि खडकवासला चौपाटी परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. या तीन दिवसांत १ सहस्र ९५३ दुचाकी, १ सहस्र ४०२ चारचाकी, तर ४० खासगी जीप यांमधून अनुमाने १२ सहस्त्रांहून अधिक प्रवासी गडावर गेल्याचा अंदाज आहे.