बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई व्हावी !
हिंदु जनजागृती समितीचे आजरा येथे निवेदन
आजरा (जिल्हा कोल्हापूर), १९ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदूंवर आक्रमण करणार्या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आजरा येथे तहसीलदार विकास आहिर यांना देण्यात आले. या वेळी आजरा तालुका शिवसेना अध्यक्ष श्री. युवराज पोवार, धर्मप्रेमी सर्वश्री विठ्ठल घेवडे लक्ष्मण माडभगत, संदीप राणे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री आनंदराव साठे, शंकर पटेकर, प्रवीण पाटील, तसेच सौ. आशा साठे, सौ. सुवर्णा पटेकर उपस्थित होत्या. समितीकडून ठिकठिकाणी अशी निवेदने देण्यात येत आहेत.