सौ. मातंगी तिवारी यांना आईच्या, कै. (श्रीमती) मृदुला ओझा यांच्या मृत्यूनंतर आणि त्यांचे मृत्यूत्तर क्रियाकर्म करतांना आलेल्या अनुभूती

इंदूर, मध्यप्रदेश येथील साधिका सौ. मातंगी तिवारी यांना आईच्या, कै. (श्रीमती) मृदुला ओझा (वय ६७ वर्षे) यांच्या मृत्यूनंतर आणि त्यांचे मृत्यूत्तर क्रियाकर्म करतांना आलेल्या अनुभूती

इंदूर, मध्यप्रदेश येथील कै. (श्रीमती) मृदुला ओझा (वय ६७ वर्षे) यांचे १९.५.२०२० ला रात्री निधन झाले. त्या वेळी कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी चालू असल्याने सर्वत्र कठीण परिस्थिती होती आणि अनेक अडचणीही येत होत्या. अशा परिस्थितीत गुरुकृपेमुळे त्यांची कन्या सौ. मातंगी तिवारी यांना वेळोवेळी साहाय्य मिळून त्यांच्या अडचणी सुटल्या. साधिकेने आईच्या निधनानंतर आणि पुढील दिवसांचे क्रियाकर्म करतांना तिला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कै. (श्रीमती) मृदुला ओझा

१. आईचा मृतदेह शवागारात असतांना आलेल्या अनुभूती

१ अ. साधिकेने आईच्या मृतदेहाभोवती सूक्ष्मातून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामपट्ट्यांचे मंडल घातल्यावर ‘श्री दत्तगुरु आईच्या लिंगदेहाचे रक्षण करत असून ‘परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून साधिकेशी बोलत आहेत’, असे तिला जाणवणे : ‘१९.५.२०२० या दिवशी रात्री आईचे निधन झाल्यावर तिला शवागारात ठेवले होते. मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघे रात्रभर रुग्णालयात थांबलो होतो. मी ‘आईच्या शवाभोवती ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामपट्ट्यांचे मानस मंडल घातले आहे’, असा भाव ठेवला होता. त्या वेळी मला ‘श्री दत्तगुरु आईच्या लिंगदेहाचे रक्षण करत आहेत’, असे जाणवले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आमच्याशी रात्रभर सूक्ष्मातून बोलत आहेत’, असेही मला जाणवले.

१ आ. कोरोनामुळे रुग्णालयातील वातावरण पुष्कळ भीतीदायक बनलेले असणे आणि परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करून सेवेला आरंभ केल्यावर भीती न वाटणे : त्या वेळी कोरोनाचा जंतूसंसर्ग होण्याच्या भयामुळे रुग्णालयातील वातावरण पुष्कळ भीतीदायक झाले होते. मी रुग्णालयात रात्री २ – ३ घंटे नामजप केला आणि परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करून ‘ऑनलाईन’ सेवेला आरंभ केला. तेव्हा मी रुग्णालयात एकटी असूनही मला भीती वाटत नव्हती. त्या वेळी मला स्थिरता जाणवत होती.

१ इ. रुग्णालयाने दिलेली पावती गहाळ झाल्याने ‘आईचा मृतदेह मिळण्यात अडचण येईल’, असे वाटणे, शवागारातील व्यक्तीशी बोलतांना साधिकेने ‘गुरुदेवांशी बोलत आहे’, असा भाव ठेवल्यावर त्या व्यक्तीने ‘तुम्ही शव ताब्यात घेऊ शकता’, असे सांगणे आणि साधिकेला तेथे श्री दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवणे : सकाळी आईचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिकेतून ‘मुक्तीधाम’ला (अंत्यविधी करण्याच्या ठिकाणी) जायचे होते. मृतदेह शवागारात ठेवण्यापूर्वी रुग्णालयात एक पावती (स्लीप) दिली जाते. नंतर ती पावती दाखवल्यावरच मृतदेह ताब्यात मिळतो. घाईगडबडीत ती पावती माझ्या भावाकडून गहाळ झाली. त्यामुळे आम्हाला पुष्कळ ताण आला होता. शवागारात गेल्यावर आम्ही पूर्ण शरणागतीने ‘परात्पर गुरुदेवांशी बोलत आहोत’, असा भाव ठेवून तेथील व्यक्तीला सर्व परिस्थिती प्रांजळपणे सांगितली. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, ‘‘मी तुम्हाला ओळखतो. तुम्हाला पावती देतांना मीच होतो. तुम्ही शव (मृतदेह) ताब्यात घेऊ शकता.’’ तेव्हा मला तेथे ‘प्रत्यक्ष दत्तगुरुच उभे आहेत’, असे जाणवले. खरेतर रुग्णालयात सर्वांनी केवळ डोळे उघडे ठेवून तोंडवळ्याचा सर्व भाग झाकलेला होता. त्यामुळे एकमेकांना ओळखणे कठीण असतांना ती व्यक्ती ‘असे कसे म्हणाली ?’, याचे मला आश्चर्य वाटले.

सौ. मातंगी तिवारी

२. मृत्यूत्तर क्रियाकर्मे करतांना आलेल्या अनुभूती

२ अ. अस्थीविसर्जनाचा तिसरा दिवस

२ अ १. विधीला आरंभ झाल्यावर साधिकेला आईचा तोंडवळा दिसणे आणि विधीच्या शेवटी गुरुजींनी ‘माताजी तृप्त होवोत’, असे म्हटल्यावर तिला तीन वेळा आईने ढेकर दिल्याप्रमाणे आवाज ऐकू येणे : तिसर्‍या दिवशी आईच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी आम्ही ‘मुक्तीधाम’ येथे गेलो. गुरुजींनी विधीला आरंभ केल्यावर मला माझ्या डोळ्यांसमोर आईचा तोंडवळा दिसला. ती प्रसन्न आणि आनंदी दिसत होती. विधीच्या शेवटी गुरुजी म्हणाले, ‘‘माताजी तृप्त होवोत.’’ तेव्हा तीन वेळा मला आईने ढेकर दिल्याप्रमाणे आवाज ऐकू आला. नंतर आईने मला सूक्ष्मातून विचारले, ‘आता कुठे जायचे आहे ?’ तेव्हा मी तिला ‘आता नदीत अस्थीविसर्जन करण्यासाठी जायचे आहे’, असे सांगितल्यावर ती पुष्कळ प्रसन्न झाल्याचे जाणवले.

२ अ २. अस्थीकलश घेऊन नदीकाठी जातांना तो हलका वाटणे, अस्थी विसर्जनाच्या ठिकाणी सूक्ष्मातून विमान आल्याचे जाणवणे आणि अस्थी विसर्जनानंतर साधिकेसह इतरत्र असलेल्या दोन नातेवाइकांनाही हलकेपणा जाणवणे : नदीच्या काठी अस्थीकलश घेऊन जातांना आम्हाला खांद्यावरील कलश हलका वाटत होता. अस्थी विसर्जनाच्या वेळी ‘एक विमान आले आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला हलके वाटत होते. नंतर मी माझी बहीण आणि मावशी यांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनीही ‘अस्थी विसर्जनानंतर आम्हाला हलकेपणा जाणवत होता’, असे सांगितले. त्या वेळी आम्हाला सनातन हिंदु धर्मात सांगितलेले धार्मिक कृतींचे महत्त्व कळले. परात्पर गुरुदेवांनी हे सर्व शास्त्र शिकवल्यामुळे आम्ही त्याची अनुभूती घेऊ शकलो.

२ आ. नववा आणि दहावा दिवस

२ आ. विधी करतांना अनाहत चक्रावर पुष्कळ जडपणा जाणवणे आणि परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे सूक्ष्मातून दर्शन होऊन ‘त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या तेजाने सर्व कार्य विधीवत् पूर्ण झाले आहे’, असे जाणवणे : नवव्या आणि दहाव्या दिवशीचे कार्य होत असतांना मला माझ्या अनाहत चक्रावर पुष्कळ जडपणा जाणवत होता. मी मनातल्या मनात परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली आणि स्वतःच्या शरिरावरील त्रासदायक आवरण काढले. त्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ तेथे सूक्ष्मातून उभ्या असून त्यांच्याकडून सूर्यासारखे तेज सर्वत्र प्रक्षेपित होत आहे आणि त्या तेजाने सर्व त्रास न्यून होऊन सर्व कार्य विधीवत् पूर्ण झाले आहे’, असे मला जाणवले.

२ इ. अकरावा आणि बारावा दिवस

१. गुरुजी पिंडदानाचा विधी करत असतांना मला पुष्कळ आनंद होत होता.

२. नंतर तेथे एक मृतदेह आणल्यामुळे वातावरणात जडपणा आला. त्या वेळी मी श्री दत्तगुरूंना प्रार्थना केली. तेव्हा मला सर्व दिशांना आणि वनस्पतींमध्येही दत्तगुरूंचे दर्शन झाले. त्या वेळी ‘श्राद्धकर्म चालू असलेल्या ठिकाणी एक चमकदार तेजस्वी दोरी बांधली असून ‘श्री दत्तगुरूंनी आपल्या त्रिशूळाने भूमीला स्पर्श केला आहे’, असेही मला जाणवले.

कृतज्ञता

दळणवळण बंदीच्या कठीण परिस्थितीतही परात्पर गुरुदेवांनी आम्हाला आईच्या अग्नीदहन संस्कारापासून ते सपिंडी श्राद्धापर्यंतचे पूर्ण १३ दिवस ‘मी तुमच्यासमवेत आहे’, हा विश्वास पदोपदी दिला. त्यांनी सूक्ष्मातून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. आमच्याकडून साधना करवून घेतली आणि भावावस्थेचा अनुभवही दिला. तेथील गुरुजींनी सांगितले, ‘‘अनेकांच्या नातेवाइकांचे केवळ दहनसंस्कारच झाले असून नंतरचे कोणतेच विधी झाले नाहीत. तुमच्या आईचे सर्व विधी पूर्ण होणे, ही ईश्वराचीच इच्छा होती.’’

‘पुढील भीषण काळात येणार्‍या संकटांवर आपण केवळ गुरुकृपेनेच मात करू शकतो’, हे गुरुदेवांनी मला या अनुभूतीतून लक्षात आणून दिले. यासाठी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. मातंगी तिवारी, इंदूर, मध्यप्रदेश. (२३.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक