पू. (कै.) वैद्य विनय भावेकाका यांच्या देहत्यागाविषयी श्री. सुरेश सावंत यांना मिळालेल्या पूर्वसूचना
१. पू. वैद्य भावेकाका चारचाकी वाहनातून खाली उतरतांना काठीचा आधार घेऊन उतरत असल्याचे पाहून ‘पू. काका लवकरच देहत्याग करतील’, असे वाटणे
‘१६ एप्रिल ते ८ जून २०२१ या कालावधीत मी कुडाळ, सिंधुदुर्ग येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वास्तव्याला होतो. त्या वेळी पू. वैद्य भावेकाका कुडाळ सेवाकेंद्रात आले होते. सेवाकेंद्रात आल्यावर चारचाकी वाहनातून खाली उतरतांना पू. भावेकाका काठीचा आधार घेऊन खाली उतरत होते. ते पुष्कळ थकलेले दिसले. त्यांच्याकडे पाहिल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘पू. काका लवकरच देहत्याग करतील.’
२. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातील पू. वैद्य भावेकाका यांचे छायाचित्र पाहिल्यावर ‘पू. काकांनी देहत्याग केला असेल’, असा विचार मनात येणे
२१.६.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये पू. वैद्य भावेकाका यांचा ‘कोरोनाच्या साथीमध्ये उपयोगी ठरू शकणारी आयुर्वेदातील औषधे’ हा लेख त्यांच्या छायाचित्रासह प्रसिद्ध झाला होता. तो लेख वाचतांना माझे लक्ष लेखाच्या प्रारंभी असलेल्या पू. भावेकाका यांच्या छायाचित्राकडे गेले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘पू. काकांनी देहत्याग केला असेल.’ त्यानंतर २६.६.२०२१ या दिवशी सकाळी मला कळले, ‘पू. वैद्य भावेकाका यांनी २५.६.२०२१ या दिवशी रात्री १० वाजता देहत्याग केला.’ त्या प्रसंगी माझ्या लक्षात आले, ‘पू. वैद्य भावेकाका यांच्याविषयी मला जे वाटत होते, त्या मला मिळालेल्या पूर्वसूचना होत्या.’
– श्री. सुरेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |