पुँछ (जम्मू-काश्मीर) येथील भारतीय सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यातील चकमकीत पाकिस्तानी सैनिक आतंकवाद्यांच्या बाजूने लढत असल्याचा संशय
पुँछ (जम्मू-काश्मीर) – येथील जंगलांमध्ये गेल्या ८ दिवसांपासून भारतीय सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात चकमक चालू असून या आतंकवाद्यांना पाकिस्तानी सैनिकांनी प्रशिक्षण दिल्याचा आणि ते स्वतःही त्यांच्या बाजूने लढत असल्याचा संशय भारतीय सैन्य अन् पोलीस यांच्या सूत्रांनी व्यक्त केला. या चकमकीत आतापर्यंत भारतीय सैन्याचे एकूण ९ सैनिक आणि अधिकारी हुतात्मा झाले आहेत. या चकमकीत अद्याप एकही आतंकवादी ठार झाल्याचे समोर आलेले नाही. या जंगलाला पूर्णपणे वेढा घालण्यात आला असून अजूनही दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार चालू आहे.