(म्हणे) ‘बांगलादेशमध्ये कुराणाचा अवमान करणार्यांचा शिरच्छेद करावा !’
बंगालमधील वादग्रस्त फुरफुरा मशिदीचे मौलवी पीरजादा अब्बास सिद्दीकी यांचा फतवा
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार अशा मौलानांवर कधीही कारवाई करणार नाही, हे जाणा ! बंगाल हे दुसरे बांगलादेश झाले असल्याने उद्या तेथेही हिंदू आणि त्यांची मंदिरे यांवर आक्रमणे चालू झाली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक
कोलकाता (बंगाल) – बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपातील श्री हनुमानाच्या मूर्तीच्या पायाजळ ज्यांनी कुराण ठेवले आणि तेथे हनुमान चालिसाचे पठण केले, त्यांचा शिरच्छेद केला पाहिजे, असा फतवा बंगालमधील फुरफुरा शरीफ या मशिदीचे मौलवी तथा ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’चे संस्थापक पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी केले. २४ परगणा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. या विधानाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यावरून भाजपचे नेते तरुण ज्योती तिवारी यांनी कोलकाता येथे पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
Furfura Sharif is actually legitimizing the violence taking place against the minority communities in Bangladesh by Islamic radicals: @Shehzad_Ind, Political Analyst, tells TIMES NOW. | #HinduPhobialsReal pic.twitter.com/s0XhbDBfYh
— TIMES NOW (@TimesNow) October 18, 2021
अब्बास सिद्दीकी यांनी पुढे म्हटले आहे की,
१. जर लोकांना वाटते की, त्यांना कुराणाचा अवमान करण्याचा अधिकार आहे, तर मी सांगतो की, मलाही त्यांचा शिरच्छेद करण्याचा अधिकार आहे.
२. मुसलमान युवक दुर्गापूजेमध्ये सहभागी होतात, हे अयोग्य आहे. मला आठवते काही वर्षांपूर्वी दुर्गापूजेच्या मंडपामध्ये काबा (मुसलमानांचे धार्मिक क्षेत्र) सारखे दृश्य निर्माण करण्यात आले होते. जर त्यांना काबा इतकेच आवडत असेल, तर ते इस्लामचा स्वीकार का करत नाहीत ? (हिंदू त्यांच्या धार्मिक उत्सवांत सर्वधर्मसमभाव दाखवण्याचा जो हास्यास्पद प्रयत्न करतात, त्याकडे धर्मांध कोणत्या भावाने पहातात ?, हे हिंदूंच्या आतातरी लक्षात येऊन ते असे प्रयत्न थांबवतील का ? – संपादक)
सिद्दीकी यांनी यापूर्वी केले होते ‘भारतात विषाणूमुळे ५० कोटी लोक मरावेत’, असे विधान !
अब्बास सिद्दीकी यांनी कोरोनाच्या काळातही आक्षेपार्ह विधान केले होते. ते म्हणाले होते, ‘‘अल्लाने माझी प्रार्थना स्वीकारावी आणि भारतात असा विषाणू पसरवावा की, त्याद्वारे ५० कोटी लोकांचा मृत्यू व्हावा.’’ (या विधानावरून जर अब्बास यांच्यावर तेव्हाच कठोर कारवाई झाली असती, तर आता त्यांचे असे विधान करण्याचे धाडस झाले नसते. आताही तृणमूल काँग्रेसच्या राज्यात पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता अल्पच आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! – संपादक)