मातृभाषेतून शिक्षण देण्याचे महत्त्व !
‘शिक्षण आपल्या मातृभाषेतून घ्यावे, हा जागतिक सिद्धांत आहे. थोर शिक्षणतज्ञांचेही तेच मत आहे; पण आपल्या भारतात आणि गोव्यातही प्राथमिक शिक्षण इंग्रजीत घेण्याकडे अनेक सुशिक्षित पालकांचा कल आहे. त्यातल्या त्यात महिलांना वाटते की, आपले बाळ फाड फाड इंग्रजीत बोलावे; परंतु पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून शिकलेली मुले आपली संस्कृती आणि मातृभाषा यांपासून दूर जातात. पुढे त्यांना आपली संस्कृती, पालक, आपली माणसे, देश स्वतःचा वाटणार नाही. खरे म्हणजे आपण स्वत:च आपली मुले देशविरोधी बनवणार आहोत. त्या ब्रिटिशांनी भारत देशाची दोन शकले (तुकडे) केली. आता त्यांना देशविरोधी पिढी सिद्ध करण्याचा आनंद मिळणार आहे आणि हा आनंद मिळण्यास आम्हीच कारणीभूत ठरणार आहोत. त्यामुळे आपण आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिकवण्याचा निर्धार करूया आणि इतरांनाही सांगूया.’
(साभार : साप्ताहिक ‘गोवा प्रोटेक्टर’, १७ नोव्हेंबर २०१७)