दुर्गापूर (बंगाल) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्या भाविकांवर अज्ञातांकडून आक्रमण !
|
दुर्गापूर (बंगाल) – येथे १६ ऑक्टोबरच्या रात्री श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्या हिंदूंवर अज्ञातांनी आक्रमण करून त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. या आक्रमणात काही जण घायाळ झाले. या घटनेनंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घायाळांना रुग्णालयात नेले. आक्रमण करणार्यांची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके बनवली आहेत.