पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र’ संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी भगवान वानखेडे यांची निवड

 

‘पंढरपूर लाईव्ह न्यूज पोर्टल’चे मुख्य संपादक भगवान वानखेडे

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी आणि सबंध महाराष्ट्रात कार्यरत असलेली शासनमान्य पत्रकार संघटना ‘पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र’च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी ‘पंढरपूर लाईव्ह न्यूज पोर्टल’चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी ही निवड केली आहे.

भगवान वानखेडे हे मागील ३ वर्षांपासून या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी कार्यरत होते. त्यांच्या प्रामाणिक कार्याची नोंद घेऊन आता सोलापूर जिल्ह्यानंतर त्यांना पश्चिम महाराष्ट्रात संघटनेचे कार्य विस्तार करण्याची धुरा सोपवण्यात आली आहे. पत्रकारांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी ‘पत्रकार संरक्षण समिती’च्या माध्यमातून पत्रकार बांधवांना संघटित करण्यासाठी लवकरच सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे नूतन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.