स्वभावदोष-अहंने पीडले आम्हा । मुक्ती द्यावी यातून आम्हा ।।
देवा (टीप १),
स्वभावदोष-अहंने पीडले आम्हा ।
मुक्ती द्यावी यातून आम्हा ।। १ ।।
चिवट स्वभावदोष ते जाता जाईना ।
चिकाटी ती टिकून राहीना ।। २ ।।
कर्तेपणा तो सरता सरेना ।
देवच करतो, हे मतीस (टीप २) कळेना ।। ३ ।।
भाव काय तो अनुभवता येईना ।
अहंभावाचे विचार काही केल्या जाईना ।। ४ ।।
यावर देवाने दिलेले उत्तर – कशाला तू डोके फोडतोस ।
मन-बुद्धीच्या विचारांत अडकतोस ।। ५ ।।
अरे, मला तू शरण ये ना ।
‘काहीच कळत नाही’, हे स्वीकार ना ।। ६ ।।
सांगितलेले (टीप ३) तू कृतीत आण ना ।
स्वभावदोष कसे घालवायचे, ते मी पाहीन ना ।। ७ ।।
आज्ञापालन तू पटपट कर ना ।
जलद उन्नतीचा तू मार्ग धर ना ।। ८ ।।
तू एक तरी दमदार पाऊल पुढे टाक ना ।
‘मी १० पावले पुढे नेईन’, हे वचन माझे आहे ना ।। ९ ।।
वचन माझे हे युगान्युगाचे ।
श्रद्धा त्यावर ठेव निःसंशयाने ।। १० ।।
टीप १ – सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – बुद्धीस
टीप ३ – स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत करायला सांगितलेले प्रयत्न
इदं न मम ।
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |