येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधकाला आलेल्या अनुभूती
१. आश्रमातील भिंतीला हात लावल्यावर पूर्ण शरिरात चैतन्य जात असल्याचे जाणवणे
‘रामनाथी आश्रम पहातांना ‘आश्रमातील भिंतीला हात लावल्यावर काय जाणवते ?’, याविषयी प्रयोग घेण्यात आला. त्या वेळी हातातून माझ्या पूर्ण शरिरात मोठ्या प्रमाणात चैतन्य जाऊ लागले. ‘ते चैतन्य साठवण्यासाठी माझा स्थूलदेह अपुरा पडत आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी मला प्रसन्न वाटत होते.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी वापरलेला आरसा पहातांना ‘त्या आरशातून तेज बाहेर पडत आहे’, असे मला जाणवत होते. ते तेज मला सहन होत नव्हते.
३. आश्रमातील एका शिबिरात सहभागी झाल्यावर बोटांवर दैवी कण आढळून प्रसन्न वाटणे
आश्रमातील एका शिबिरात मी सहभागी झालो होतो त्या वेळी माझ्या डाव्या हाताच्या बोटांवर दैवी कण दिसू लागले. त्या वेळी मला प्रसन्न वाटत होते. शिबिर संपल्यावर निवासस्थानी जातांना माझे डोके दुखू लागले आणि थोडा त्रास जाणवला.
४. सत्संगामध्ये मन निर्विचारहोऊन भावजागृती होणे
एका संतांच्या सत्संगात गेल्यावर माझे मन निर्विचार झाले. अधून-मधून माझी भावजागृती होऊन ‘संतांकडून मला मोठ्या प्रमाणात शक्ती मिळत आहे आणि माझे शरीर भारित होत आहे’, असे जाणवले. त्या वेळी ‘संतांच्या चरणांवर नतमस्तक होऊन शांत पडून रहावे’, असे मला वाटत होते.
परात्पर गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांनी मला या अनुभूती दिल्या, यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. दिनेश सीताराम कडव, दापोली, रत्नागिरी. (१९.१.२०२०)