गोवा विधानसभेचे आजपासून अधिवेशन

५ वर्षांच्या कालावधीतील अखेरचे अधिवेशन

पणजी, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – गोवा विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाला १८ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या ५ वर्षांच्या कालावधीतील विधानसभेचे हे अखेरचे अधिवेशन आहे.

या अधिवेशनात ७७ तारांकित (महत्त्वाचे), तर २२१ अतारांकित (दुय्यम महत्त्वाचे) प्रश्न चर्चेला येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रश्नोत्तर तास, शून्य प्रहर, अनुदानित मागण्यांवर चर्चा आणि सरकारची ३ विधेयके चर्चेला येणार आहेत. या अधिवेशनात वादग्रस्त ‘भूमिपुत्र’ विधेयक चर्चेला घेतले जाणार नसल्याचे शासनाने यापूर्वीच घोषित केले आहे. लुईझिन फालेरो यांनी आमदारकीचे त्यागपत्र दिल्यानंतर विधानसभेचे संख्याबळ आता ४० वरून ३९ झाले आहे.