श्रीमती निलिमा नाईक यांना जाणवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये !
सर्व साधकांना मोक्षपथ दाखवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
२९.७.२०२० च्या रात्री १०.३० वाजता मला झोप येत नव्हती. रात्री १२.३० वाजता मला डोळ्यांसमोर पूर्वीच्या पंतप्रधानांचे तोंडवळे दिसत होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘हे मला का दिसतात ?’ तेव्हा पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.
१. समाजाची स्थिती
अ. ‘पूर्वीच्या सरकारने (काँग्रेसने) देश किती वाईट अवस्थेला नेला होता. कुणीही देश आणि धर्म यांच्या स्थितीकडे लक्ष दिले नाही. आताचे सरकार (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली) देशाला पुढे नेण्याचा थोडा तरी प्रयत्न करत आहे, असे वाटते.
आ. पूर्वी काही पिठाधिशांनी धर्मरक्षणाचे काही प्रमाणात प्रयत्न केले आणि करत आहेत. काही संप्रदायही प्रयत्न करत आहेत.
इ. सर्वसाधारण जनतेला यांपैकी काहीच नको आहे. लोकांना ‘केवळ मजा करावी’, असे वाटते.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले पालट
अ. परात्पर गुरु डॉ. आठवलेरूपी सूर्य उगवला. त्यांनी सर्वांना साधना सांगितली. नामस्मरणाचे महत्त्व सांगून ते करण्यासाठी प्रयत्न करायले शिकवले.
आ. त्यांनी साधकांना मोक्षाला कसे जायचे, याचे मार्गदर्शन केले.
इ. त्यांनी साधकांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठायला शिकवून संतपदापर्यंत पोचवले.
अशा या आमच्या गुरूंविषयी किती सांगावे ? ‘त्यांच्या चरणी केवळ पडून रहावे’, असे मला वाटते. ‘परात्पर गुरुदेव, हे विचार माझे नसून आपलेच आहे. ते लिहून घेतल्याविषयी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती निलिमा नाईक, फोंडा, गोवा. (२९.७.२०२०)