राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना !
कोल्हापूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने कोल्हापूर शाखेच्या वतीने दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराजांना घोषावर (संघाचा बँड ) ‘राजर्षी शाहू’ या नवीन रचनेचे वादन करून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करून केलेल्या संघाच्या लयबद्ध घोष वादनाचे नागरिकांनी या वेळी स्वागत केले.