दौंडमध्ये (पुणे) एकाच रात्रीत ५ ठिकाणी सशस्र दरोडे !
कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा ! – संपादक
दौंड (जिल्हा पुणे) – शहरात १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी ४ ठिकाणी दरोडा टाकला, तर १ ठिकाणी घरफोडी केली आहे. यात अनुमाने ३ लाखांहून अधिक ऐवज लंपास केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दरोड्यात दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अण्णासाहेब देशमुख यांच्या घरावर दरोडा टाकून त्यांना घायाळ करत रोख ७० सहस्र रुपयांसह सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर पळून गेले. (पोलिसाच्या घरावरच दरोडा टाकण्याची हिंमत चोर करतात. यातून त्यांना पोलिसांची भीतीच नसल्याचे लक्षात येते. – संपादक) एका ठिकाणी दरोडेखोरांशी प्रतिकार करत त्यांना पिटाळून लावणार्या तरुणीच्या धाडसाचे कौतुक होत आहे. तसेच एकाच परिसरात ५ ठिकाणी चोरी झाल्याने भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रभर दरोडेखोरांचा शोध घेतला; मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.