हिंदु विधवा महिला म्हणजे संयमाची उच्चतम कोटी !
१. वैधव्य हे संयमाची परिसीमा असणे
‘सृष्टीमध्ये हिंदु विधवांची निर्मिती करून विधात्याने कमाल केली आहे. पत्नी वारल्यावर पुरुष स्वतःच्या दुःखाचे रडगाणे गातात, तेव्हा मला हसू येते आणि माझ्या डोळ्यांसमोर विधवा भगिनींची प्रतिमा उभी रहाते. हिंदु धर्माने संयमाला उच्चतम कोटीपर्यंत पोचवले आहे आणि वैधव्य ही त्याची परिसीमा आहे. अनेक विधवा महिला दुःखाला दुःखच मानत नाहीत. त्यांच्यासाठी त्याग ही एक अत्यंत स्वाभाविक गोष्ट असते. त्यागाचा त्याग करणे त्यांना दुःखरूप वाटते. विधवेचे दुःखच तिच्यासाठी सुख मानले गेले आहे.
२. वैधव्य हे हिंदु धर्माचे भूषण असणे
ही अवस्था वाईट नसून चांगली आहे. यामध्येच हिंदु धर्माची श्रेष्ठता आहे. मी वैधव्याला हिंदु धर्माचे भूषण मानतो. विधवा भगिनींना पहातांना मी आपोआपच त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ‘विधवेचे दर्शन’ हे माझ्यासाठी अपशकुन नाही, तर प्रातःकाळी तिचे दर्शन झाल्यास मी स्वतःला कृतार्थ मानतो. तिच्याकडून मिळालेला आशीर्वाद हा मी एक मोठा प्रसादच मानतो. तिला पाहून मी समस्त दुःखे विसरून जातो. विधवेच्या तुलनेत पुरुष एक अधम प्राणी आहे. पुरुषाला विधवेच्या धैर्याचे अनुकरण करणे अशक्य आहे. विधवांना प्राचीन काळापासून जो वारसा मिळाला आहे, त्याच्यासमोर पुरुषाच्या क्षणिक त्यागाच्या पुंजीची काय किंमत होऊ शकेल ?
३. विधवा-धर्माचा लोप झाला, जर कुणी अज्ञानाने किंवा दुर्बुद्धीमुळे सेवेच्या या साक्षात् मूर्तीला विरोध केला, तर हिंदु धर्माची फार मोठी हानी होईल.’
– मोहनदास गांधी (संदर्भ : अज्ञात)