कृष्णा घाट येथे दशक्रिया विधीसाठी ब्राह्मण समाजाला सुविधा पुरवाव्यात ! – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे निवेदन
मिरज, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – कृष्णा घाट येथे दशक्रिया विधीसाठी ब्राह्मण समाजाला सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या वतीने भाजप नेते सुरेश आवटी तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आले. दोघांनीही निवेदन स्वीकारून सविस्तर चर्चा केली आणि संबंधित विभागास कार्यवाहीच्या सूचना दिल्या. या वेळी महासंघाच्या वतीने सर्वश्री श्रेयस गाडगीळ, राजेंद्र नातू, आदित्य बेडकेर, हेरंभ अभ्यंकर (काशीकर) उपस्थित होते.