केरळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती : २६ जणांचा मृत्यू
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. पुरामुळे २६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील पठाणमथिट्टा, कोट्टायम्, एर्नाकुलम्, इडुक्की आणि त्रिशूर या ५ जिल्ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् म्हणाले की, अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे भारतीय हवामान विभागाने राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची चेतावणी दिली आहे.
केरल में भारी बारिश से कई मकानों को नुकसान #KeralaRains #Kerala #Rain | @JournoAshutosh https://t.co/YyU8oNz3qn
— AajTak (@aajtak) October 17, 2021