पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावरील जलवाहिनी फुटल्याने सहस्रो लिटर पाणी वाया
पेडणे, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – पेडणे येथील पत्रादेवी ते धारगळ या राष्ट्रीय महामार्गावरील जलवाहिनी फुटल्याने सहस्रो लिटर पाणी वाया गेले. राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असतांना जलवाहिनीला धक्का बसून ही जलवाहिनी फुटली. यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असतांना कामातील निष्काळजीपणामुळे अनेक वेळा जलवाहिनी फुटल्याने धारगळ आणि पेडणे भागांतील लोकांची गैरसोय झाली आहे.