‘मये ग्राम रक्षक दल’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संयुक्तरित्या मये येथील श्री महामाया मंदिरात सामूहिक शस्त्रपूजन
डिचोली, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – दसर्याच्या निमित्ताने ‘मये ग्राम रक्षक दल’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मये येथील श्री महामाया मंदिरात सामूहिक शस्त्रपूजनाचा कार्यक्रम झाला.
या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी विजयादशमीच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे श्री. समीर प्रभुगावकर यांनी वाचन केले. श्री. श्रीधर मणेरीकर यांनी शस्त्रांची पूजा केली, तसेच हिंदूंमध्ये धर्माभिमान आणि राष्ट्राभिमान जागृत होण्यासाठी श्रींच्या चरणी प्रार्थना केली. सर्वश्री कल्पेश रामा आणि अभिषेक वळवईकर यांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी सर्वांमध्ये चेतना निर्माण करणार्या घोषणा दिल्या. शेवटी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य दिल्याविषयी श्री. रामदास साळगावकर यांनी श्री महामाया मंदिर देवस्थान समितीचे आभार व्यक्त केले.