ब्रिटनमधील चर्चमध्ये धर्मांधाकडून सत्ताधारी पक्षाच्या खासदाराची चाकू भोसकून हत्या
ब्रिटनमध्ये आतंकवादी आक्रमण
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार डेव्हिड अॅमेस यांची १५ ऑक्टोबर या दिवशी पूर्व लंडनमधील लीघ-ऑन-सी या समुद्रकिनारी असलेल्या शहरातील बेल्फेअर्स मेथोडिस्ट चर्चमध्ये धर्मांधाकडून चाकू भोसकून हत्या करण्यात आली. ते चर्चमध्ये मतदारांशी चर्चा करत असतांना ही घटना घडली. पोलिसांनी हे आतंकवादी आक्रमण असल्याचे घोषित केले. पोलिसांनी आक्रमणकर्त्या धर्मांधाला अटक करून त्याच्याकडून चाकू जप्त केला आहे. या प्रकरणाची चौकशी आतंकवादविरोधी विभागाकडे सोपवण्यात आली आहे. ६९ वर्षीय अॅमेस हे वर्ष १९९७ पासून संसदेचे सदस्य होते. ब्रिटनमध्ये वर्ष २०१६ मध्ये मजूर पक्षाचे खासदार जो कॉक्स यांचीदेखील चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. यासह वर्ष २०१० आणि वर्ष २००० मध्ये खासदारांवर आक्रमणे झाली होती.
Breaking News: David Amess, a Conservative Party lawmaker in Britain, was stabbed to death as he was meeting with constituents in southeast England, according to news outlets. https://t.co/MAoS5Sstj1
— The New York Times (@nytimes) October 15, 2021