‘अच्छी बाते’ नावाच्या ‘अॅप’द्वारे जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अजहर याच्या जिहादी विचारांचा प्रसार
भारत सरकार या ‘अॅप’वर कधी बंदी घालणार ? – संपादक
नवी देहली – पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’चा प्रमुख मौलाना (इस्लामी विद्वान) मसूद अजहर याच्याशी संबंधित ‘अच्छी बाते’ नावाचे अॅप आहे. ‘गूगल प्ले स्टोअर’ने त्याला शैक्षणिक गटात ठेवले आहे. या अॅपमधून इस्लामी शिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात आहे; मात्र प्रत्यक्षात याद्वारे तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. या अॅपचा सर्व्हर जर्मनीमध्ये आहे. (‘सर्व्हर’ म्हणजे असा संगणक अथवा संगणकांचा समूह जो संबंधित अॅपमध्ये असलेली सर्व माहिती त्याच्याकडे संरक्षित करून ठेवतो आणि अॅपच्या वापरकर्त्यांना (‘यूझर्स’ना) ती पुरवतो.)
#Exclusive
The web page has old write-ups by Masood Azhar under the pen name ‘Saadi’, a pseudo-identity well-identified with the JeM chief.
(@AnkiitKoomar)https://t.co/ihGj0Tqz0L— IndiaToday (@IndiaToday) October 12, 2021
१. या अॅपमध्ये मसूद अजहर आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित पुस्तकांतील लिखाण अन् ध्वनी संदेश (ऑडिओ) आहेत. यांद्वारे तरुणांना आतंकवादाकडे ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
२. हे अॅप ४ डिसेंबर २०२० या दिवशी चालू करण्यात आले आहे. आतापर्यंत ५ सहस्रांहून अधिक वेळा हे डाऊनलोड करण्यात आले आहे. पाकिस्तानातील अनेक इस्लामी धर्मगुरूंचे विचार, संदेश आणि पुस्तकांतील लिखाणही या अॅपवर आहे.