विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासमवेत पालकांनाही धर्मशिक्षण मिळणे अत्यावश्यक ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

सांगली येथे भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ (उजवीकडे) यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना श्री. संतोष देसाई, सौ. स्मिता माईणकर आणि श्रीमती मधुरा तोफखाने

सांगली, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – सध्याच्या काळात विद्यार्थी बराच काळ भ्रमणभाषवर असतात. त्यामुळे ते वाचनसंस्कृती आणि संस्कार यांपासून लांब जात आहेत. तरी विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासमवेत पालकांनाही धर्मशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे, असे मत भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले. सनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने त्यांची भेट घेतली असता त्यांनी हे मत व्यक्त केले. या वेळी आमदार श्री. गाडगीळ यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर, हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने, श्री. संतोष देसाई उपस्थित होते.

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे भाजपच्या नगरसेविका सौ. ऋतुजा अभिनव गोंधळी (डावीकडे) यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना सौ. विजया वेसणेकर (उजवीकडे)

कोल्हापूर – हुपरी येथे भाजपच्या महिला आघाडीच्या हुपरी शहरप्रमुख, तसेच विद्यमान नगरसेविका सौ. ऋतुजा अभिनव गोंधळी यांची भेट घेऊन त्यांना अभियानाविषयी अवगत करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विजया वेसणेकर यांनी सौ. ऋतुजा अभिनव गोंधळी यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले.