सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी उलगडलेला नवरात्रीचा भावार्थ
प्रतिपदा : ‘अद्वैतरूपी एकत्वाच्या प्राप्तीच्या साधनामार्गाचा प्रारंभ
द्वितीया : अंतरातील द्वैतरूपी दैत्याच्या संहाराचा प्रारंभ
तृतीया : त्रिगुणातीत होण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ
चतुर्थी : चारही देहांच्या शुद्धीकरणाचा प्रारंभ
पंचमी : पंचमहाभूतांवर नियंत्रण मिळण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ
षष्ठी : षडरिपूंच्या संहाराचा प्रारंभ
सप्तमी : सप्तचक्र भेदनाच्या प्रक्रियेचा प्रारंभ
अष्टमी : आंतरिक यज्ञ अन् अष्टमहासिद्धींच्या प्राप्तीचा प्रारंभ
नवमी : अंतरबाह्य शत्रूंच्या संहाराचा अन् नवद्वारांवर अधिपत्य मिळवण्याचा प्रारंभ
दशमी : दहा दिशांवरील विजयाचा प्रारंभ, म्हणजेच पूर्णत्वाचा विजयोत्सव !’
– सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे (१५.१०.२०१८)