शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला !
मुंबई – सिटी सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यासाठी ‘पीएम्एल्ए’ न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. आरोपी आनंद अडसूळ सध्या रुग्णालयात आहेत.
आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. सिटी को-ऑप. बँकेचे अध्यक्ष असतांना त्यांच्या कार्यकाळात बँकेत ९०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली होती. या तक्रारीनंतर अंमलबजावणी संचालनालयाकडून अडसूळ यांच्या रहात्या घरी आणि कार्यालय येथे धाडी टाकण्यात आल्या. या वेळी अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे सध्या ते गोरेगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.