१३ गडकिल्ले दत्तक घेणार ! – छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा
अशा प्रकारच्या निर्णयामुळे गडकोटांचे संवर्धन होण्यास साहाय्य होईल ! – संपादक
परिंचे (पुरंदर) – रायगडाच्या पुनर्बांधणीचे काम वेगात चालू असून सरकारचा एकही पैसा न घेता पुढाकार घेऊन जनतेच्या साहाय्याने महाराष्ट्रातील १३ गडकोट किल्ले दत्तक घेणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजीराजे यांनी केली. राम वाघोले यांनी लिहिलेल्या ‘ऐतिहासिक परिंचे गाव’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.