विजयादशमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नंदुरबार येथे शस्त्रपूजन !
हिंदूंनो, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सिद्ध होणे काळाची आवश्यकता ! – संपादक
नंदुरबार, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – विजयादशमीच्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. प्रभु श्रीरामांनी आजच्याच दिवशी रावणाचा वध केला. अर्जुनाने आजच्याच दिवशी शमीच्या ढोलीतून शस्त्र काढून कौरवांना परास्त केले. त्यामुळे आपणही आजच्या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प करायला हवा. आपला विजय निश्चित आहे. हिंदूंनी स्वतःवर आक्रमण होण्याची वाट न पहाता आताच प्रशिक्षित होऊन अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी स्वतः सिद्ध होणे, ही काळाची आवश्यकता आहे. महिलांनीसुद्धा आपल्या महान इतिहासात अजरामर झालेल्या वीरांगनांचा आदर्श ठेवून इतिहासातून बोध घ्यायला हवा, असे प्रतिपादन समितीचे डॉ. सतीश बागुल यांनी केले.
येथील देसाईपुरा भागातील सिद्धीविनायक मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात आले. श्री. हेमंत पाटील आणि सौ. आशा हेमंत पाटील यांनी शस्त्रपूजन केले. त्यापूर्वी आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
या वेळी श्री सिद्धीविनायक गणपति मंदिराचे पुजारी श्री. संजय त्रिवेदी, डॉ. उपेंद्र शाह, पत्रकार योगेंद्र जोशी, श्री. गणेश सोनार, धर्मप्रेमी उज्ज्वल राजपूत, पंकज डाबी, धीरज चौधरी, आकाश गावित, भूषण बागुल, गौरव धामणे, विजय जोशी, भरत मोरे, योगेश जोशी आदी उपस्थित होते.
अभिप्राय : घोषणा देतांना वीरश्री जागृत होत होती. यापुढे कुठल्याही कार्यक्रमाला मला बोलावले तर पुष्कळ आनंद होईल ! – डॉ. उपेंद्र शाह