गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका !
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अनंत करमुसे यांना मारहाण झाल्याचे प्रकरण
ठाणे, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अनंत करमुसे यांना घरातून नेऊन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी ३ पोलीस शिपायांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर १४ ऑक्टोबर या दिवशी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
अनंत करमुसे यांना मारहाण होत असतांना मंत्री आव्हाड तेथे उपस्थित असल्याचे करमुसे यांनी पोलिसांकडे प्रविष्ट केलेल्या तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी तेथील सीसीटीव्ही फुटेजची नोंद घेण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.