काश्मीरमध्ये भाजप, संघ आणि काश्मिरी हिंदू यांना लक्ष्य करण्याचे आय.एस्.आय.चे षड्यंत्र !
दिशाभूल करण्यासाठी नवीन आतंकवादी संघटनेची स्थापना
यातून पुन्हा स्पष्ट होते की, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक आहे ! – संपादक
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने २१ सप्टेंबर या दिवशी पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये अनेक आतंकवादी संघटनांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. यात जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रमणे करण्याचा कट रचण्यात आला. काश्मीरमध्ये मुख्यत्वे पोलीस, सुरक्षादल, गुप्तचर खात्यांसोबत काम करणारे काश्मिरी यांना ठार मारण्याचे ठरवण्यात आले. तसेच काश्मिरी नसलेल्या लोकांना आणि भाजप आणि रा.स्व. संघ यांच्याशी संबंधित लोकांनाही मारण्यासाठी लक्ष्य म्हणून निवडण्यात आले. काश्मीर खोर्यात तणाव निर्माण करण्यासाठी २०० लोकांची सूची बनवून त्यांची हत्या करण्याची योजना आखली.
Pakistani intelligence agency ISI recently held a meeting with leaders of several terror outfits in Pakistan-occupied Kashmir’s Muzaffarabad.
(@arvindojha )#India #Pakistan https://t.co/VH4WYHuz8p— IndiaToday (@IndiaToday) October 15, 2021
१. ‘ही आक्रमणे स्थानिक नागरिकांनी आतंकवाद्यांना समर्थन म्हणून स्वतःच केली आहेत आणि यामध्ये आतंकवादी संघटनांचा सहभाग नाही’, हे दर्शवण्यासाठी ही आक्रमणे घडवून आणण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांच्या सूचीत नसलेल्या आतंकवाद्यांचा वापर करण्यात येणार आहे.
२. या बैठकीत एक नवीन आतंकवादी संघटना स्थापन केली गेली, जी भारतीय अन्वेषण यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी या हत्या आणि आक्रमणे यांचे दायित्व घेईल, अशी माहिती समोर आली आहे.