आंतरराज्य डिझेल चोरी करणारी टोळी पकडून देण्यात युवकांचे साहाय्य !
पोलिसांकडून श्रेय लाटण्याचा प्रकार !
केडगाव – दौंड तालुक्यातील पारगाव येथील युवकांनी आंतरराज्य डिझेल चोरी करणारी टोळी पकडून देण्यास पोलिसांना साहाय्य केले आहे; मात्र यवत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचे श्रेय मिळवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत पोलिसांनी स्थानिक युवकांच्या सहकार्याचा उल्लेख केला नसल्याने यवत पोलिसांना प्रसिद्धीचा हव्यास असल्याची चर्चा परिसरात आहे. (जो गुन्हा इतरांच्या साहाय्यामुळे उघडकीस आला आहे, त्याचे श्रेय मिळवण्याचा प्रयत्न करणे हे पोलिसांसाठी लज्जास्पद आहे. – संपादक)