कु. बांधव्या श्रेष्ठी हिला श्री कामाख्यादेवीच्या यज्ञाच्या वेळी झालेले त्रास आणि आलेली अनुभूती

‘१४.१२.२०१८ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या श्री कामाख्यादेवीच्या यज्ञापूर्वी आणि नंतर मला झालेले शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास अन् आलेली अनुभूती पुढे देत आहे.

कु. बांधव्या श्रेष्ठी

१. यज्ञापूर्वी झालेले त्रास

१ अ. शारीरिक त्रास : ‘मला २ दिवसांपासून शारीरिक त्रास होत होते. माझे संपूर्ण शरीर दुखत होते. यज्ञाच्या दिवशी सकाळपासून माझे त्रास अधिक वाढले. माझे हात-पाय थरथरत होते आणि मला हालचाल करण्यासही त्राण उरले नव्हते.

१ आ. आध्यात्मिक त्रास : मी सकाळी एक घंटा उपायांच्या खोलीत बसले. तेव्हा माझा त्रास अधिकच वाढला. सहसाधिकेने पू. रेखाताईंना विचारून मला नामजपादी उपाय सांगितले; परंतु ते करतांना नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढले. ‘मी अंथरूणालाच खिळून रहाणार का ? माझे आध्यात्मिक त्रास वाढत आहेत. त्यामुळे मी करत असलेली साधना व्यय होत आहे. माझी प्रगती होणार नाही’, अशा प्रकारच्या नकारात्मक विचारांचे प्रमाण माझ्या मनात वाढले होते. मी सहसाधिकेच्या सांगण्याप्रमाणे कागदावर मंडल घालून विचार लिहून काढले. नंतर मी औषध घेऊन झोपले. तेव्हा मला झोप लागली.

२. यज्ञाच्या वेळी झालेले त्रास

२ अ. यज्ञापूर्वी शारीरिक थकवा असून मनात नकारात्मक विचार असणे : मी झोपून उठल्यावर औषधाच्या प्रभावामुळे माझ्या शारीरिक वेदना थोड्या अल्प झाल्या होत्या; परंतु तरीही मला शारीरिक थकवा आणि माझ्या मनात नकारात्मक विचार होते. ‘त्यामुळे खोलीतून बाहेर जाऊ नये’, असे मला वाटत होते. तेव्हा ‘थोड्या वेळाने जाऊया किंवा भ्रमणभाष पहात बसूया’, असे विचार माझ्या मनात येत होते. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी या विचारांवर मात करून यज्ञाच्या ठिकाणी जाऊन बसले.

२ आ. यज्ञाच्या ठिकाणी गेल्यावर झालेले त्रास

१. मी यज्ञाच्या ठिकाणी जाऊन बसल्यावर माझ्या शारीरिक त्रासांचे प्रमाण पुन्हा वाढले. मी पाठीमागे उशी घेऊन बसले, तरी वेदना न्यून होत नव्हत्या.

२. मी डोळे बंद करून प्रार्थना करत असतांना माझा तोंडवळा मला विचित्र असल्याचे जाणवत होते; म्हणून मी गुरुदेवांचे स्मरण करत होते. तेव्हा मला त्यांचाही तोंडवळा विचित्र दिसत होता.

३. त्यामुळे मला डोळे बंद करायची भीती वाटू लागली; म्हणून ‘मी डोळे उघडे ठेवून प्रार्थना आणि त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे’, असे प्रयत्न चालू केले.

३. अनुभूती

३ अ. पूर्णाहुती झाल्यानंतर भावपूर्ण प्रार्थना होणे आणि त्यानंतर शारीरिक त्रास अल्प होऊन मनही हलके होणे : पूर्णाहुतीच्या आधी मला पुष्कळ त्रास होत होता. ‘येथे न बसता झोपूया’, असे मला वाटत होते. तेव्हा गुरुदेवांच्या कृपेमुळे माझी अंतर्मनातून भावपूर्ण प्रार्थना होत होती. पूर्णाहुतीनंतर माझे मन हलके झाले. माझा शारीरिक त्रास अल्प झाला आणि मला आध्यात्मिक लाभ होऊ लागला. यज्ञ संपला, तरी ‘थोडा वेळ इथेच बसूया’, असे मला वाटत होते. मला यज्ञासाठी येतांना चालता येत नव्हते; परंतु यज्ञ संपल्यानंतर मला माझ्या खोलीत सहजच जाता आले. या अनुभूतीबद्दल श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. बांधव्या श्रेष्ठी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१५.१२.२०१८)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक