चंडियागाच्या वेळी साधिकेला आलेली अनुभूती
‘महर्षींनी नाडीपट्टीद्वारे केलेल्या आज्ञेप्रमाणे सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात झालेल्या चंडियागाच्या वेळी हवन चालू असतांना यज्ञाला उपस्थित असलेल्या सर्व साधकांना ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे स्वाहा ।’ हा मंत्र वैखरीतून म्हणायला सांगितला होता. त्या वेळी ‘मी स्वतः आहुती देत आहे’, असे वाटून मला माझे शरीर पुष्कळ हलके झाल्याचे जाणवले आणि ‘देवी सर्वांची आहुती स्वीकारत आहे’, असेही जाणवत होते. त्या वेळी ‘एक देवी दुसर्या देवीला घास भरवत आहे आणि देवी तृप्त झाली आहे’, असे जाणवून माझ्या मनाला शांती अनुभवता आली.’
– सौ. पुष्पा पराडकर (६१ टक्के आध्यात्मिक पातळी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक