दसर्यानिमित्त खंडोबाच्या जेजुरी गडाला संपूर्ण विद्युत् रोषणाई !
जेजुरी (पुणे) – महाराष्ट्राच्या खंडोबा भक्तांचे श्रद्धास्थान असणार्या जेजुरीचा दसरा उत्सव म्हणजे ‘मर्दानी दसरा’ मानला जातो. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत गडकोटामध्ये प्रतिदिन मुख्य मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि नित्यपूजा होत आहे. येणार्या भाविकांना रांगेने देवदर्शन दिले जात आहे. दसर्याच्या दिवशी उत्सव होणार नसला, तरी धार्मिक विधी साध्या पद्धतीने साजरा केला जाईल, अशी माहिती देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे-पाटील यांनी दिली. दसर्यानिमित्त मार्तंडदेव संस्थानकडून संपूर्ण गडाला विद्युत् रोेषणाई करण्यात आली आहे.