सौ. नीता मनोज सोलंकी यांच्या समवेत आणि त्या नसतांना गरबा नृत्याच्या प्रयोगाच्या वेळी सौ. अवनी संदीप आळशी यांना जाणवलेली सूत्रे
वर्ष २०२० च्या नवरात्रोत्सवाच्या काळात सौ. नीता सोलंकी यांच्या समवेत तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे आणि नसणारे साधक यांनी गरबा नृत्य करणे अन् त्या नसतांना याच साधकांनी गरबा नृत्य करणे, असा एक प्रयोग संशोधनाच्या दृष्टीने घेण्यात आला होता. त्या वेळी सौ. अवनी संदीप आळशी यांना आलेल्या अनूभूती आणि गरब्याच्या माध्यमातून त्यांना झालेला आध्यात्मिक लाभ येथे देत आहोत.
प्रयोग १ : सौ. नीता सोलंकी यांच्या समवेत गरबा नृत्य करतांना
१. ‘प्रयोग चालू होण्यापूर्वी माझे डोके पुष्कळ दुखत होते आणि मला थकवा जाणवत होता. मी प्रयोगासाठी चित्रीकरण कक्षात आले आणि डोकेदुखी अल्प होऊन काही मिनिटांतच ती पूर्णपणे थांबली.
२. चित्रीकरण कक्षात आल्यावर वातावरण पुष्कळ चैतन्यमय वाटत होते आणि माझा भाव जागृत होत होता.
३. सौ. नीता सोलंकी गरबा करत असतांना त्यांच्यात भाव जाणवत होता. ‘त्यांचे नृत्य बघत रहावे’, असे वाटत होते. त्यांच्या नृत्यातून पुष्कळ चांगली स्पंदने येत होती. ‘त्या स्वतःला विसरून देवासाठी नाचत आहेत’, असे वाटत होते.
४. मी त्यांच्या समवेत काही वेळ नाचले; परंतु त्या वेळी मला त्रास देणार्या सूक्ष्मातील वाईट शक्तीचे अस्तित्व अधिक होते. त्यामुळे त्यांच्या नाचाच्या हालचाली (‘स्टेप्स’) मला आकलन होत नव्हत्या. माझा त्यांच्या समवेत नाचतांना गोंधळ होत होता. त्यामुळे मला त्यांच्यासारखे नाचता येत नव्हते, तरी नृत्य करतांना पुष्कळ आनंद मिळत होता. ‘मी हलकी हलकी होत आहे’, असे मला वाटत होते.
५. गरबा करतांना सर्वांच्या सात्त्विक हालचालीत एकसारखेपणा हवा होता; परंतु ‘सूक्ष्मातील वाईट शक्तीला वेडेवाकडे हातवारे करून नाचावे’, असे वाटत होते.
६. ‘मला गरबा करतांना नीट नाचता येत नाही’, असा माझ्या मनात विचार वाईट शक्तीने घातला. त्यामुळे ‘नाचायला नको’, असे वाटून मी जागेवर जाऊन बसले.
प्रयोग २ : सौ. नीता सोलंकी नसतांना गरबा नृत्य करतांना
१. मी गरबा नृत्य करत असतांना तेथे सौ. नीता सोलंकी उपस्थित नव्हत्या, तरी नाचतांना मनाच्या गोंधळाचे प्रमाण अल्प झाले होते. वाईट शक्ती नाचतांना माझा आत्मविश्वास न्यून करत होती, तरी मी मात करून नाचत होते.
२. मी साधारण ३० मिनिटे नाचले, तरी मला थकवा जाणवला नाही.
३. गरब्याच्या गाण्याने माझा भाव जागृत होत होता. त्या वेळी ‘देवीसाठी नृत्य करत आहे’, या भावाने मी नाचत होते. ‘तेव्हा आम्हा साधकांसह देवी प्रत्यक्ष मधे उभी आहे’, असे वाटत होते.
४. हे नृत्य करतांना मला सूक्ष्मातील वाईट शक्तीचे अस्तित्व जाणवत नव्हते. ‘मीच नृत्य करत आहे’, असे मला वाटत होते.
प्रयोग चालू होण्यापूर्वी मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती, तरी गरब्याच्या प्रयोगानंतर तो त्रास अल्प होऊन आनंद जाणवला.’
– सौ. अवनी संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१०.२०२०)
|