मध्यप्रदेशात शाळेमध्ये ‘भारत माता की जय’ न बोलण्याविषयी विचारणा करणार्या हिंदु विद्यार्थ्यांना धर्मांध विद्यार्थ्यांकडून शाळेच्या बाहेर मारहाण
जिवे मारण्याचीही धमकी
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारे हिंदूंना मारहाण करण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कसे ? असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! – संपादक
आगर-माळवा (मध्यप्रदेश) – येथे एका शाळेत सकाळच्या प्रार्थनेनंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. शाळेतील मुसलमान विद्यार्थ्यांनी घोषणा देण्यास नकार दिला. याविषयी भरत सिंह नावाच्या विद्यार्थ्याने त्यांना याविषयी विचारणा केल्यावर ‘भारत माता काय असते ?’ असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी केला. शाळा सुटल्यावर शाळेतील काही धर्मांध विद्यार्थ्यांनी या घोषणेवरून भरत सिंह सहित अन्य काही हिंदु विद्यार्थ्यांना मारहाण केली. पुन्हा ‘भारत माता की जय’ बोलल्यास ठार मारण्यात येईल’, अशी धमकीही या धर्मांध विद्यार्थ्यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच तणावाच्या स्थितीमुळे या परिसरामध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
MP students booked for assaulting schoolmates over ‘Bharat Mata Ki Jai’ chants https://t.co/zcdsiwNQ5p
— Republic (@republic) October 13, 2021