ढाका (बांगलादेश) येथे श्री दुर्गादेवी मंदिरात देवीची पूजा करण्यास धर्मांधांचा विरोध !

मूर्तीचे दुसर्‍या ठिकाणी हालवून तिची स्थापना !

  • बांगलादेशातील असुरक्षित हिंदू आणि त्यांचे धार्मिक उत्सव ! – संपादक
  • मुसलमानबहुल बांगलादेशामध्ये हिंदूंच्या धार्मिक सणांच्या या स्थितीविषयी मानवाधिकार संघटना का बोलत नाहीत ? – संपादक
  • बांगलादेशातील हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात असतांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार काय प्रयत्न करणार ! – संपादक
धर्मांधांच्या विरोधात निदर्शने करताना हिंदू

ढाका (बांगलादेश) – येथील टीपू सुलतान मार्गावरील श्री दुर्गादेवी मंदिरामध्ये हिंदूंना पूजा करण्यापासून धर्मांधांनी रोखले. ‘बांगलादेश हिंदु युनिटी कौन्सिल’ने याविषयी ट्वीट करून माहिती दिली आहे. येथील सरकारकडून श्री दुर्गादेवीच्या पूजेसाठी तात्पुरती जागा देण्यात आली आहे. मंदिरातील देवीची मूर्ती या जागेत हालवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या मंदिरावर आक्रमणही करण्यात आले होते. यामुळे स्थानिक हिंदूंनी धर्मांधांच्या विरोधात निदर्शनेही केली होती. श्री दुर्गादेवीचे हे मंदिर वर्ष १९२१ मध्ये बांधण्यात आले आहे. ‘एक दिवस आम्ही आमचे मंदिर वाचवण्यात यशस्वी होऊ’, असा विश्‍वास बांगलादेश हिंदु युनिटी कौन्सिलने व्यक्त केला.

चटगाव येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड !

श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड

बांगलादेशातील चटगाव येथे १० ऑक्टोबरला फिरंगी बाजरामध्ये असलेल्या श्री शमशानेश्‍वर शिव विग्रह मंदिरातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती. येथील पूजामंडपामध्ये ही मूर्ती स्थापित करण्यात आली होती. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. या घटनेच्या विरोधात हिंदूंनी निदर्शनेही केली.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक