काबुल (अफगाणिस्तान) येथील मंदिरात नवरात्रोत्सवाचे आयोजन
भारत सरकारने आम्हाला भारतामध्ये न्यावे ! – हिंदूंची मागणी
काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यापासून तेथील लोकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आले असतांना काबुलमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंकडून नवरात्रोत्सव साजरा केला जात असल्याची एक चांगली बातमी आहे. येथील असमाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्ताने भजन आणि धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे काही व्हिडिओज समोर आले आहेत.
नवरात्रि पर्व के दौरान अफ़ग़ानिस्तान के अल्पसंख्यक हिन्दू समुदाय ने काबुल के आसमाई मंदिर में जमा होकर कीर्तन किया.
प्रणय उपाध्याय @JournoPranay की रिपोर्ट #Afghanistan #MinorityHinduCommunity #AsmaiTemple #Kabulhttps://t.co/dR1yvAZ1Gi
— ABP News (@ABPNews) October 12, 2021
असमाई मंदिर व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष राम शरण सिंह यांनी सांगितले की, नवरात्रीनिमित्ताने भजनासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जवळपास १५० जण सहभागी झाले होते. या हिंदूंनी भारत सरकारकडे त्यांना भारतात नेण्याची मागणी केली आहे. सध्या अफगाणिस्तानची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.