सप्तमीला श्री महालक्ष्मीदेवीची इंद्राणी मातृका रूपात अलंकार पूजा !
कोल्हापूर, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – सप्तमीला श्री महालक्ष्मीदेवीची इंद्राणी मातृका रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती, तर जोतिबा देवाची विशेष अलंकार रूपातील पूजा बांधण्यात आली होती. महालक्ष्मी मंदिरात अंबामातेचे हे अनोखे रूप पहाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.